बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या एका नव्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीनं छोटा पुढारीला किस केलं आहे. याचा प्रोमो आऊट झाल्यानंतर अनेकांनी यांवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. कलर्स मराठीने हा बिग बॉसचा प्रोमो आपल्या अकांऊटवरुन पोस्ट केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (हेही वाचा - Nikki Tamboli Fight: निक्की तांबोळी आता भिडली निखिलशी; काढली एकमेकांची अक्कल)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी आणि धनश्याम दराडे (Ghanshyam Darade) उर्फ छोटा पुढारी यांची मैत्री बहरताना दिसत आहे. यामध्ये धनश्याम निक्कीला बोलतो की, तू माझ्यासोबत कसंही वाग पण मी तुझ्यासोबतच प्रेमानेच वागणार. या प्रोमोमध्ये निक्की घनश्यामला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर निक्की तांबोळी घनश्यामला गालावर किस करतानाही दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
View this post on Instagram
[Poll ID="null" title="undefined"] नेहमीच सर्वांशी पंगा घेणारी आणि प्रत्येकासोबत वाद घालण्यात पुढे असणारी निक्की तांबोळी देखील त्याचे लाड करताना दिसत आहे.