‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा मराठी टीझर प्रदर्शित; पाहा ही खास झलक
Ajay Devgn and Kajol (PC - Twitter)

Marathi Teaser Of Tanhaji: The Unsung Warrior- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपण लहानपणापासूनच ‘गड आला पण सिंह गेला’ हे वाक्य वाचलं आहे. मराठ्यांच्या साम्राज्यातील एक शूरवीर मावळा तान्हाजी मालुसरे, त्यांच्याबद्दलचं हे वाक्य सर्वश्रुत आहेच. आता या मावळ्याचा इतिहास व त्यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा ऍक्शनपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमधून चित्रपटाचे आणि कथानकाचे भव्यदिव्य दर्शन घडते. आणि विशेष म्हणजे हा ट्रेलर पाहून, चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी अनेक प्रेक्षकांनी केली होती. आणि याच प्रेक्षकांच्या आग्रहास्तव, अजय देवगण याने अलीकडे हा चित्रपट मराठीत देखील प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली.

काहीच वेळापूर्वी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाचा मराठी टीझर लाँच करण्यात आला. हा मराठी टीझर पाहून अनेक नेटकऱ्यांनी याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Exclusive: Tanhaji चित्रपटात Ajay Devgan यांच्या लुक मधील बारकावे सांगणाऱ्या आहेत तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज; पाहा काय म्हणाल्या शीतल मालुसरे

दरम्यान, हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार असून, यात अभिनेता अजय देवगण 'तानाजी मालुसरे' यांची भूमिका साकारणार आहे. तर काजोल ही तानाजी मालुसरे यांच्या पत्नी 'सावित्रीबाई मालुसरे' ही भूमिका साकारताना दिसेल. तसेच सैफ अली खान, शरद केळकर, पद्मावती राव हे प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.