वर्षाखेरीस रसिकांसाठी या '4' मराठी सिनेमांची मेजवानी!
डिसेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणारे मराठी सिनेमे (File Photo)

List of Bollywood Movies Releasing in December 2018: वर्षाचा अखरेचा महिना म्हणजे ख्रिसमस, सेलिब्रेशन, सुट्ट्या आणि न्यु ईअरची धूम. या सेलिब्रेशनच्या वातावरणात मराठी सिनेमेही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यात तुम्हाला रोमांटिक, अॅक्शन सिनेमांची रेलचेल असणार आहे. तर मग वर्षाचा शेवटचा महिना अधिक एन्जॉय करा या काही खास सिनेमांच्या सोबतीने.... वर्षाखेरीस हे '5' धमाकेदार बॉलिवूड सिनेमे मनोरंजनासाठी सज्ज!

मुंबई पुणे मुंबई ३ (Mumbai Pune Mumbai 3)

2010 मध्ये आलेल्या स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या 'मुंबई पुणे मुंबई' सिनेमाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली. या सिनेमाची जादू अजूनही कायम आहे. त्यानंतर गौरी-गौतम यांच्या नात्याचा पुढचा प्रवास 'मुंबई पुणे मुंबई 2' या सिनेमातून दाखवण्यात आला. आता पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाचे नवे वळण 'मुंबई पुणे मुंबई 3' या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आरॉन (Aaron)

शशांक केतकर, नेहा जोशी स्टारर 'आरॉन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा फ्रेंच आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रीत केला आहे. तसंच यात दोन फ्रेंच कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. 'उबंटू' फेम अथर्व पाध्ये याची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ओमकार रमेश शेट्टी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक केले असून हा सिनेमा 7 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तु तिथे असावे (Tu Tithe Asave)

अजून एक नवाकोरा सिनेमा 'तु तिथे असावे' रसिकांच्या भेटीला येणार आहे. भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी ही तगडी स्टारकास्टही आहे. गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून छोट्याशा खेड्यातून शहरात आलेल्या मल्हारचा गायक होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 7 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

माऊली (Mauli)

'लय भारी' या सिनेमानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'माऊली' सिनेमातून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. लय भारी सिनेमाचा सिक्वेन्स असलेला माऊली हा सिनेमा 14 डिसेंबरला प्रदर्शित होईल. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून जेनेलिया देशमुख हिने निर्मितीची धुरा सांभाळली आहे.