रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणारा रिमा लागूंचा अखेरचा सिनेमा !
सिनेमा पोस्टर (Photo Credit- Instagram)

स्वतःच घर हा प्रत्येकाच्याच जिव्हाळयाचा विषय. या विषयावर भाष्य करणारा एक सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमात घर आणि त्यासंबंधित नातेसंबंधांचा प्रवास अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचं नाव आहे होम स्वीट होम. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत. तर त्यापलिकडे जावून कुटुंबाचा एक सदस्य होणारी होण्याची क्षमता या वास्तूत असते, असे सिनेमातील वैभव जोशींची कविता सांगते.

रिमा लागू आणि मोहन भागवत यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमात स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकारही आहेत. तर लेखक-अभिनेते हृषीकेश जोशी या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पर्दापण करत आहेत. सिनेमाच्या निर्मितीची सुत्रं हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर यांनी सांभाळली आहेत.

पाहा सिनेमाचा ट्रेलर...

हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांनी या सिनेमाचे कथालेखन केले आहे. तर कवी, गीतकार वैभव जोशींच्या गीतांना संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी स्वरसाज चढवला आहे. होम स्वीट होम हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.