Prarthana Behare And Ravi Jadhav Eco Friendly Bappa (Photo Credits: Instagram)

Ganesh Chaturthi 2020: श्री गणरायाचंं आगमन यंंदा दरवर्षी पेक्षा लवकर होत आहे, येत्या शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्ट ला बाप्पा अनेकांच्या घरी येणार आहेत. यंंदा कोरोनाचे भान राखुन अनेकांंनी छोट्या मुर्ती घरी आणण्याचे ठरवले आहे तर अनेकांंनी आपल्याच हातुन बाप्पाची मुर्ती साकारण्याचा विडा उचलला आहे. या मध्ये सेलिब्रिटी मंडळी सुद्धा काही मागे नाहीत. मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तसेच दिग्दर्शक रवी जाधव यांंनी तर आपली शाडुच्या मातीपासुन बनलेली बाप्पाची मुर्ती पुर्ण करुन त्याची झलक आपल्या फॅन्ससोबत शेअर सुद्धा केली आहे. Ganpati Murti Home Delivery: 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, पुणे येथे अभिनव उपक्रम

रवी जाधव हे मागील 18 वर्षांपासुन आपल्या हातानेच बाप्पाची मुर्ती साकारतात यंंदा सुद्धा त्यांनी मुर्ती घडवतानाचा आणि आणि पुर्ण केल्यानंंतरचा सुंंदर फोटो शेअर केला आहे. (हेही वाचा, Ganpati Visarjan Online Booking: गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी मंंडळ आणि नागरिकांना BMC कडे करावं लागणार Slot Booking ; कुठे व कसे कराल बूकिंग?)

रवी जाधव पोस्ट

 

View this post on Instagram

 

मातीपासून मूर्तीपर्यंत 🙏🌺

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

तर, अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन गणेशाची मुर्ती साकारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रार्थना बेहरे पोस्ट

 

View this post on Instagram

 

ॐ गं गणपतये नमः

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere) on

दरवर्षी च्या तुलनेत यंंदा सणाचे सार्वजनिक स्तरावरील सोहळे साध्या स्वरुपात होतील मात्र घरच्या घरी तुम्ही दरवेळी प्रमाणे त्याच उत्साहात सण साजरा करु शकता. येत्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठी परिवाराकडुन अ‍ॅडव्हान्स मध्ये शुभेच्छा!