Close
Search

Ganpati Murti Home Delivery: 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, पुणे येथे अभिनव उपक्रम

गणेशोत्सव जरी परंपरेने साजरा होत असला तरी, या परंपरेचे पालन करण्यासाठी तुम्हाला काहीसे हायटेक व्हावे लागणार आहे. जेणेकरुन तुमचा बाप्पा तुम्हाला घरपोच मिळू शकेल.

सण आणि उत्सव अण्णासाहेब चवरे|
Ganpati Murti Home Delivery: 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नवी मुंबई, पुणे येथे अभिनव उपक्रम
Ganpati | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Ganpati Utsav 2020: कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत जर तुम्हाला गणपती बाप्पां0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5+%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE', 900, 500);" href="javascript:void(0);">

सण आणि उत्सव अण्णासाहेब चवरे|
Ganpati Murti Home Delivery: 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी'; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नवी मुंबई, पुणे येथे अभिनव उपक्रम
Ganpati | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Ganpati Utsav 2020: कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची असेल तर काळजी करु नका. तुम्हाला घराबाहेर न जाताही गणेश मूर्ती घरी आणता येणार आहे. होय, 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी' (Ganpati Murti Home Delivery) असा एक अभिनव उपक्रम मुंबई आणि पुणे (Pune) येथे सुरु झाला आहे. परंतू, गणेशोत्सव जरी परंपरेने साजरा होत असला तरी, या परंपरेचे पालन करण्यासाठी तुम्हाला काहीसे हायटेक व्हावे लागणार आहे. जेणेकरुन तुमचा बाप्पा तुम्हाला घरपोच मिळू शकेल.

नवी मुंबई आणि पुणे येथील काही मूर्तीकार आणि मंडळांनी 'बाप्पा तुमच्या घरी, गणेश मूर्तीची होम डिलिव्हरी' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जर नागरिकांनी आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जर ऑनलाईन बुक केली आणि संबंधित मंडळांना त्याची कल्पना दिली तर तुम्हाला तुमचा बाप्पा घरपोच मिळू शकेल. काही मूर्तीकारांनीही घरपोच बाप्पा ही सेवा सुरु केली आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा बाप्पा घरपोच हवा असेल तर, तुम्ही नक्कीच या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता. (हेही वाचा, Ganpati Visarjan Online Booking: गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी मंंडळ आणि नागरिकांना BMC कडे करावं लागणार Slot Booking; कुठे व कसे कराल बूकिंग?)

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य आणि देशभरात लॉकडाऊन आहे. गेली अनेक महिने सर्व नागरिक लॉकडाऊनचा सामना करत आहेत. अलिकडे हळूहळू अनलॉक करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने सुरुवात केली आहे. परतू, असे असले तरी अद्यापही राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यासोबतच सर्व उत्सव, समारंभ यावरही मर्यादा आहेत. सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सवही यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. त्यामुळे घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. मात्र हा उत्सव साजरा करतानाही नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

Comments
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change