Varan Bhat Loncha Kon Nay Koncha| ( Archived, edited, symbolic images )

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) चित्रपटाचा ट्रेलरच इतका वादात सापडला की, माजरेकर यांना अखेर एक पाऊल मागे यावे लागले. चित्रपटातील बोल्ड दृश्ये आणि तो पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असल्याने वाद निर्माण झाला. प्रामुख्याने एका संस्थेने दिलेल्या तक्रारीवरुन राष्ट्रीय महिला आयोग अधिक आक्रमक झाला. या आयोगाने थेट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या चित्रपटाबाबत तक्रार केली. महिला आयोगाने दखल घेऊन तक्रार केल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिया आणि इंटरनेटसह इतर माध्यमांतून हटविण्यात आला.

महिला आयोगाने याबाबत एक पत्रही लिहिले होते. ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर 10 जानेवारी रोजी युट्युबवर प्रदर्शीत झाला होता. या ट्रेलरमध्ये चित्रपटातील काही दृश्ये दाखविण्यात आली होती. ज्यावर आक्षेप घेण्यात आला. ही दृश्ये चित्रपटातूनही वगळावीत अशीही मागणी करण्यात आली. जेष्ठ नाटककार, समिक्षक, पत्रकार, लेखक अशा विविध प्रकारात लिखानाची मुशाफीरी केलेल्या जयंत पवार यांच्या कथेवर हा सिनेमा बेतला आहे. हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर असल्याचे सांगितले जाते आहे. हा चित्रपट येत्या 14 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. (हेही वाचा, Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha: महेश मांजरेकर यांच्या ‘कोन नाय कोनचा’ चित्रपटातील ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप; युट्युबवर Trailer अनुपलब्ध)

महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. तर नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत यांची निर्मिती आहे. सहनिर्माते विजय शिंदे आहेत. हितेश मोडक यांनी चित्रपटाला संगित दिले आहे. चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मीरा शहा, उमेश जगताप, गणेश, यादव अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.