Mahesh Manjrekar | ( Archived, edited, symbolic images )

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjreka) यांच्या ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला खरा. मात्र या ट्रेलरच्या बातम्यांपेक्षा त्याच्या वादाचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे. मांजरेकर यांच्या ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ चित्रपट ट्रेलरवर महिला आयोगाची (National Commission for Women) करडी नजर पडली आहे. चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे मांजरेकर यांचा ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ वादाच्या भोवऱ्यात सापडलाच आहे. मात्र, आता तो अडचणीतही येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चित्रपटातील दृश्यांची थेट राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय ( Union Ministry of Information and Broadcasting) यांच्याकडे तक्रारही केली आहे. हा चित्रपट येत्या दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. दरम्यन, या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर उपलब्ध होत नाही.

राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीनुसार, मांजरेकर यांच्या चित्रपटातील अल्पवयीन मुलांची दाखवण्यात आलेली आक्षेपार्ह दृश्ये आणि इतर काही महिला पात्रं वगळण्यात यावीत असे म्हटल्याचे समजते. मांजरेकर यांच्या या चित्रपटाची प्रदीर्घ काळ चर्चा होती. त्यांच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेकांना त्यांच्या या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी (10 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलर लॉन्च होताच त्यावर अनेकांनी टीका केली. काहींनी कौतुक. महिला आयोगाने मात्र थेट तक्रार. (हेही वाचा, Panghrun Marathi Movie: महेश मांजरेकरांचा 'पांघरुण' चित्रपट लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस)

ट्विट

ट्विट

महाराष्ट्रातील भारतीय स्त्री शक्ती नावाच्या एका संस्थेने राष्ट्रीय महिला आयोकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगनेही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. आता या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय काय भुमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय स्त्री शक्ती नावाच्या संस्थेचा आक्षेप आहे की, 'या चित्रपटात आणि ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले आहे.'