Madhura Velankar Satam Birthday: ब्युटी विथ ब्रेन अभिनेत्री ते मधुरव पुस्तकाची लेखिका असलेल्या मधुरा वेलणकर हिच्याबद्दल काही खास गोष्टी
Madhura Velankar Birthday (Photo Credits: File)

रंगभूमीवर वरुन अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी आणि कलेचा वारसा लाभलेल्या प्रदिप वेलणकर (Pradip Velankar) यांची कन्या मधुरा वेलणकर साटम (Madhura Velankar Satam) हिचा आज वाढदिवस. तिची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्यापासून लेखिका बनण्यापर्यंतचा प्रवास हा या क्षेत्रात येऊ पाहणा-या नवोदित कलाकारांसाठी खूपच मार्गदर्शक ठरेल असा आहे. मधुराचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 मध्ये झाला. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या तसेच हिंदीसह मराठीत चित्रपट-मालिकांमध्ये हिट ठरलेले ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांची सून असलेल्या मधुराने मात्र स्वत:च्या हिंमतीवर या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

रंगभूमीवर अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणा-या मधुराने मालिकांमधून या क्षेत्रात पदार्पण केले. आतापर्यंत तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे.

जाणून घेऊया मधुरा वेलणकर हिच्या विषयी काही खास गोष्टी:

1. मधुरा वेलणकर हिने आजवर 75 हून अधिक मालिका केल्या आहेत. यातील मृण्मयी, चक्रव्यूह, सात जन्मानच्या गाठी, अनामिका या मालिका प्रचंड गाजल्या.

2. तसेच सरीवर सरी, नॉट ओन्ली मिसेस राऊत, खबरदार, मातीच्या चुली, गोंजरी आई नंबर 1, मी अमृता बोलते, मेड इन चायना, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, हापूस, जनगणमन यांसारख्या चित्रपटात काम केले.

हेदेखील वाचा- Happy Birthday Mahesh Kothare: ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना योगायोगाने मिळाला बालकलाकार म्हणून पहिला मराठी चित्रपट, जाणून घ्या कहाणी

3. तसेच हापूस या चित्रपटात तिने आपले सासरे शिवाजी साटम यांच्यासोबत काम केले यात तिने त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

4. मधुराला नॉट ओन्ली मिसेस राऊत, सरींवर सरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

5. त्याचबरोबर जॉनी जॉनी येस पापा, जजंतरम ममंतरम या हिंदी चित्रपटांतही काम केले आहे.

6. मधुराने रंगभूमीसोबत टेलिफिल्म्स, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम केले होते.

7. आपल्या मुलाच्या युवानच्या जन्मानंतर थोडा ब्रेक घेऊन रुपेरी पडद्यापासून थोडी दूर राहिली.

8. त्यानंतर तिने 2019 मध्ये एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी या चित्रपटातून पुन्हा कमबॅक केले.

9. त्याचवर्षी आपल्या वाढदिवसादिवशीच म्हणजेच 8 ऑक्टोबर 2019 ला तिने 'मधुरव' या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका म्हणून पदार्पण केले. आयुष्यात भेटलेल्या अनेक व्यक्ती त्या दरम्यान घडलेले किस्से या पुस्तकांतून तिने मांडलेले आहेत.

10. मधुरव पुस्तकामुळे ती एक संवेदनशील लेखिका म्हणून लोकांच्या समोर आली आहे.

यामुळे तिच्या कलागुणांच्या जोरावर, हुशारीवर मधुराने या क्षेत्रात बरेच यश मिळवले. म्हणूनच तिला ब्युटी विथ ब्रेन असे आम्ही म्हटले आहे. अशा या गोंडस, निरागस चेह-याच्या हरहुन्नरी अभिनेत्रीला लेटेस्टली कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!