Anandi Gopal Anthem 'Tu ahes na' (Photo Credit: Youtube)

Anandi Gopal SongTu ahes na:  भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi) यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर उलघडणार आहे. 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) या सिनेमात आनंदीबाईंची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) साकारणार असून गोपाळरावांच्या भूमिकेत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) दिसणार आहे. या सिनेमातील एक स्त्री जन्माचा, स्त्री असण्याचा उद्धार करणारे एक गाणे समोर आले आहे.

वैभव जोशी याच्या लेखणीतून अवतरलेल्या या गीतावर अनेक गायकांनी स्वरजात चढवला आहे. अवधूत गुप्ते, रोहित राऊत, आदर्श शिंदे, राहुल देशपांडे यांच्या आवाजातील गाणे स्त्री जातीचा महिमा सांगते. स्फुर्ती, उत्साह आणि नवचेतना देते. जसराज-सौरभ-हृषिकेश या त्रिकूटाने गाणे संगीतबद्ध केले आहे. 'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझर वरून बनवलेले धम्माल Memes सोशल मीडियावर व्हायरल!

तुम्हीही ऐका हे गाणे:

आनंदीबाईंचा डॉ. आनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा खडतर प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. यापूर्वी सिनेमाचा ट्रेलर आणि इतर गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता 'तू आहेस ना' हे गाणे प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करत आहे. हा सिनेमा 15 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.