Anandi Gopal Movie: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi) यांच्या आयुष्याची कथा सांगणारा चित्रपट आनंदी गोपाळ येत्या 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आनंदीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद झळकार आहे. तर या चित्रपटातील नवे गाणं 'वाटा वाटा गं' नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
आनंदी गोपाळ चित्रपटातील रंग माळियेला या गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'वाटा वाटा गं' (Waata Waata Waata Ga) हे गाणं आनंदी बाईच्या शिक्षणाचा प्रवास कसा घडला हे दाखविणार आहे. आनंदी बाईंची शिक्षणासाठीची ओढ आणि आवड या गाण्यातून स्पष्ट होत आहे.तर 1886 साली जेव्हा भारतामध्ये मुलींना भारतामध्येही शिक्षण घेणं हा रूढीवादी समाजाला पटणारं नव्हतं त्यावेळेस आनंदीबाईंनी अमेरिकेला जाऊन वैद्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. तसेच आनंदी बाईंचे पती गोपाळराव यांचे पाठबळ मिळाल्याने त्यांनी शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण केल्याचा प्रत्यय या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा-Anandi Gopal Motion Poster: 'आनंदी गोपाळ' मध्ये डॉक्टर आनंदीबाईच्या मुख्य भूमिकेत भाग्यश्री मिलिंद)
'वाटा वाटा गं, चालिन तितक्या वाटा गं' असे या गाण्याचे बोल असून झी स्टुडिओ प्रस्तुत, नम: पिक्चर्स आणि फ्रेश लाईम फिल्मस यांच्यातर्फे हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. तर या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले असून प्रियांका बर्बे यांनी गायिले आहे.