Jhimma Poster Out: नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ म्हणणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सिद्धार्थ चांदेरकर, सोनाली कुलकर्णीसह 'हे' स्टारकास्ट झळकणार
Jhimma Poster Out (Photo Credits-Instagram)

Jhimma Poster Out: चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'झिम्मा' चित्रपटाचे पोस्टर झळकवले असून तो येत्या 23 एप्रिलला प्रदर्शित करण्यात येणार आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील स्टारकास्ट सुद्धा दिसून येत आहेत. त्यात सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृणमयी गोडबोले, निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर आणि सिद्धार्थ चांदेरकर झिम्मा मधून आपल्या भुमिका साकारताना दिसून येणार. प्रथम खुप कलाकार एकाच चित्रपटातून एकत्रित काम करणार आहेत.(Pension Trailer: सोनाली कुलकर्णी हिच्या 'पेन्शन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित Watch Video)

चित्रपटाची कथा नेमकी काय असणार हे पोस्टरवरुन सांगणे थोडे कठीणच होईल. पण पोस्टरवरुन असा अंदाज लावता येईल की, विविध पेशाचे आणि वर्गातील प्रत्येक जण आपली भुमिका साकारू शकतात. त्याचसोबत या सर्वांचे एकमेकांसोबत घट्ट नाते असल्याचे सुद्धा दिसून येत आहे.(Rang Pirticha Bawara Song: ‘Fandry’ फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा' झालं प्रदर्शित; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

'क्रेझी फ्यू फिल्म्स' आणि 'अमेय खोपकर इंन्टरटेन्मेंट' हे चित्रपटाचे निर्माते आहेत.  तर झिम्मा चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून अमितराज यांचे संगीत असणार आहे. तर चित्रपटाची नेमकी कथा काय असणार आणि प्रेक्षकांच्या तो पसंदीस पडणार का हे आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.