Rang Pirticha Bawara Song (PC - You Tube)

Rang Pirticha Bawara Song: फँड्री (Fandry) फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे (Somnath Avghade) चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'रंग प्रीतीचा बावरा' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं 'फ्री हिट दणका' या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रंग प्रीतीचा बावरा' या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

'रंग प्रीतीचा बावरा' हे गाणं जसराज जोशी यांनी गायलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला स्वामी शैलेश ही 17 वर्षीय नवोदित गायिका लाभली आहे. त्यांच्या आवाजाने मराठी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. खासकरून तरुणांना या गाण्याने वेड लावलं आहे. 'रंग प्रीतीचा बावरा' या गाण्याला आतापर्यंत हजारो व्यूज मिळाले आहेत. (वाचा - Marathi Filmfare Awards 2020: मुंबईत रंगला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा, कोणत्या चित्रपटांनी मारली बाजी येथे पाहा)

'फ्री हिट दणका' या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे निर्माता अतुल रामचंद्र तरडे, आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे हे आहेत. याशिवाय नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्माता म्हणून काम केलं आहे. तसेच संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे.