
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिची प्रमुख भूमिका असणारा सिनेमा 'पेन्शन' (Pension) चा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. गरीब कुटुंबाचा जीवन जगण्याचा संघर्ष आणि पेन्शनचे असणारे महत्त्व या सिनेमातून पाहायला मिळते. अत्यंत भावूक आणि संवेदनशील अशी सिनेमाची कथा आहे. यात 'इंद्र' नावाच्या मुलाचा बालपण ते तरुणपण असा प्रवासही पाहायला मिळतो. गावाकडे राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाचा जीवन जगण्यासाठी चाललेला संघर्षाची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. आजीच्या पेन्शनवर अवलंबून असलेले कुटुंब पेन्शन चालू राहावी म्हणून काय काय करतं, हे यातून दिसून येते.
सोनाली कुलकर्णी शिवाय सुमीत गुट्टे आणि निलांबरी खामकर यांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'इरॉस नाऊ' ने सिनेमाची निर्मिती करत असून पुंडलिक धुमाळ यांनी सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 24 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हे ही वाचा: दीपिका पादुकोणला आवडलं सोनाली कुलकर्णी ने बनविलेले हे अस्सल 'महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण'; अशा शब्दांत मानले आभार)
पहा ट्रेलर:
सोनाली कुलकर्णी हिने यापूर्वी अनेक सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'कच्चा लिंबू', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'गुलाबजाम' यांसह अनेक सिनेमातून तिने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीसोबत अनेक हिंदी सिनेमातील तिच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या सोनाली कुलकर्णीचा पेन्शन सिनेमा प्रेक्षकांना भावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.