
Jhimma 2 Box Office Collection: झिम्माच्या भरघोष यशानंतर 'झिम्मा 2' हा चित्रपट अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत सिनेमाने पाच कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या कमी वेळात मोठी जाई केली आहे. सगळीकडे झिम्मा 2 शो हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आता बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटाच्या तुलनेत वरचढ होताना दिसत आहे. दरम्यान सलमान खानचा टायगर 3 चित्रपट रिलीज झाला होता. तर अवघ्या काही दिवसांनी टायगर 3ची क्रेझ कमी होताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग झिम्मा 2 सिनेमाकडे वळला आहे.
पहिल्या दिवशी 0.95 कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी म्हणजे दुसरा दिवस १.७७ कोटी आणि रविवारी तिसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स २.५ कोटी गल्ला जमवला. चोथ्या दिवशी ०.७५ कोटी कमवले. तर सिनेमानं आतापर्यंत ५.८० कोटी ते सहा कोटींच्या आसपास कमाई केली आहे. हेंमत ढोमे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत असल्याचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले.
'झिम्मा २' हा सिनेमा मल्टी स्टारकास्ट असलेल्या सिनेंमांपैकी आहे. सुहास जोशी ,निर्मिती सावंत, क्षिती जोग, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव सारख्या अभिनेत्रींनी या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.