Holi Songs in Marathi | (Photo Credit: YouTube)

Holi/Rang Panchami 2019: कला आणि सण उत्सव यांचे भारतीय संस्कृतीत घट्ट नाते आहे. हे नाते विविध उत्सव आणि त्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधूनही पाहायला मिळते. इतकेच कशाला लेखक, कवी किंवा संगितकार यांच्या अनेक कलाकृतींमध्ये सण उत्सवांचे प्रतिबिंब पडलेले पाहायला मिळते. होळी किंवा रंगपंचमी या सणांचेच पाहा ना. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अनेक लोककला, संगीत, गायन आणि लेखन प्रकारात या दोन्ही सणांचा उल्लेख आढळतो. अगदी लावणी ते चित्रपट गीत, अभंग, भारुड आणि गवळणीपर्यंत. होळी आणि रंगपंचमी या सणाचे औचित्य साधून आज आम्ही आपल्यासाठी इथे काही लावण्या आणि गीते देत आहोत. ज्यांच्या माध्यमातून होळी, रंगपंची आदी सणांचे महत्त्व, आनंद आणि प्रेमीकांमधील अनोखे नातेसंबंध आणि विशिष्ट संवाद टीपलेला पाहायला मिळतो.

सख्या चला बागामदी

गीत - रामजी

संगीत - भास्कर चंदावरकर

स्वर - उषा मंगेशकर

चित्रपट - सामना

गीत प्रकार - लावणी

अग नाच नाच राधे उडवूया रंग

गीत - जगदीश खेबूडकर

संगीत- विश्वनाथ मोरे

स्वर - उत्तरा केळकर, सुरेश वाडकर

चित्रपट - गोंधळात गोंधळ

(हेही वाचा, Holi 2019: सावधान! होळी साजरी करा, रंग उधळा पण, रंगाचा ‘बेरंग’ केल्यास अटक नक्की: मुंबई पोलीस)

खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

फाटला ग कोना माझ्या चोळीचा

 

गीत - यादवराव रोकडे

संगीत - विठ्ठल चव्हाण

स्वर - सुलोचना चव्हाण

गीत प्रकार - लावणी

(हेही वाचा, ..आणि सुलोचना चव्हाण यांना अवघा महाराष्ट्र 'लावणीसम्राज्ञी' म्हणू लागला)

आज गोकुळात रंग खेळतो हरी

राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

गीत - सुरेश भट

संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

स्वर - लता मंगेशकर

गीत प्रकार - भावगीत

लय लय लय भारी

 

गीत - लय लय लय भारी

संगीत - अजय अतूल

गीत - गुरु ठाकूर

गायक - स्वप्नील बांदोडकर, योगीता गोडबोले

चित्रपट - लई भारी

वर दिलेली गीते, लावण्या ही केवळ प्रातिनिधीक आहेत. याप्रमाणेच अनेक गीते, लावण्यांनी मराठी चित्रपट, संगीत आणि इतर कलाकृतींनी विविध सण उत्सवांची दखल घेतली आहे. विविध सण उत्सवांना डोळ्यासमोर ठेऊन त्याची झाक गीत, संगीत आणि कलाकृतींमधून उमटवणे म्हणजे जणू कलावंताच्या प्रतिभेचा एक अनोखा अविष्कारच!