Holi 2019: होळी, धुळवड (Dhulivandan), रंगपंचमी (Rang Panchami) साजरी करताना उधळल्या जाणाऱ्या आनंदाच्या रंगाचा समाजकंटकांकडून बेरंग होऊ नये यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) सज्ज आहेत. सामाजिक एकोप्यात आनंदाचे रंग भरणाऱ्या या सणाचा जर कोणाच्या कृत्यामळे बेरंग होत असेल तर संबंधितास मुंबई पोलीस कायदेशीर हिसका दाखवणार आहेत. होळीचा सण (Holi Festival) साजरा करताना कायद्याचे पालन केले जावे त्यासाठी पोलीसांनी एक नियमावलीच दिली आहे. या नियमावलीचा भंग होताना दिसला तर पोलीस वेळीच कावाई करणार आहेत. पोलीसांच्या आदेशाचे पालन केले नाही. कायद्याचे उल्लंघन केले तर, संबंधितावर अटकेची कारवाई होऊ शकते, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
मुंबई पोलीसांनी जारी केलेल्या आदेशानुसरा, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणी, संगीत वाजवता येणार नाही. कोणाच्याही इच्छेविरुद्ध रंग लावणे, रंग, पाणी आदींचे फुगे फेकणे याला मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करताना आक्षेपार्ह, विशिष्ट समूहाला लक्ष्य करतील अशा घोषणा, लिघाण करण्यावर बंदी आहे. प्रवासी, पादचारी, दुचाकीस्वार, वाहन चालक, खासगी वाहने आदिंवर त्यांच्या पूर्वपरवानगीविणा रंग लावणे, पाण्याचे, रंगांचे फुगे फेकण्यास मनाई आहे. सार्वजनिक वाहने, स्मारके, ठिकाणे, स्थळे आदिंवर रंग टाकता येणार नाही. (हेही वाचा, Happy Holi 2019: होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल?)
मुंबई पोलीसांनी बजावले आहे की, रंगपचमी, होळी, धुळवड साजरी करताना कायद्याचे, नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, समुहावर भारतीय दंड संहिता कलम 788 अन्वये कारवाई केली जाईल. या कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्याखाली संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. 19 ते 22 मार्च या कालावधीसाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे तुम्ही जरी होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करत असाल तर, कायद्याचे भान ठेऊनच साजरी करा. रंग खेळा, रंग उधळा पण, रंगाचा ‘बेरंग’ केल्यास अटक नक्की हे पक्के ध्यानात असू द्या.