
'मी गर्लफ्रेंड पटवणार' असं म्हणत अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) त्याच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमा 'गर्लफ्रेंड'(Girlfriend) चे संकेत दिले होते. त्यानंतर अमेयची सिनेमातील गर्लफ्रेंड नेमकी कोण असणार? तिचं काय नाव असेल? याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर 'गर्लफ्रेंड' सिनेमातील त्याची गर्लफ्रेंड सई ताम्हणकर (Sai Tamhankar) असेल असे सांगण्यात आलं आहे. अमेय आणि सईने गर्लफ्रेंड सिनेमाचं खास पोस्टर शेअर केलं आहे.
गर्लफ्रेंड सिनेमाचं खास पोस्टर
Yess!
हिच ती 🙋♀️- #SaieTamhankar #Girlfriend #NachyaGotAGirlfriend #26July pic.twitter.com/Ivqg2EtsxN
— TeamSaie (@TeamSaie) May 21, 2019
सई ताम्हणकर आणि अमेय वाघ 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा 26 जुलै रोजी रसिकांसमोर घेऊन येणार आहेत. या सिनेमात सई ताम्हणकर 'अलिशा' ही भूमिका साकारत आहे. अमेय आणि सई पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये एकत्र झळकणार आहेत. Girlfriend Teaser: अमेय वाघ याच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला!
गर्लफ्रेंड या सिनेमाचे दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. तर निर्मिती रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची आहे.