मराठी अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) याच्या 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये अमेय वाघ सोबत कोणती अभिनेत्री झळकणार, याची उत्सुकता होती. टीझरमध्येही ही उत्सुकता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमातील नायिका नेमकी कोण, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही.
"मी गर्लफ्रेंड पटवणार", असं म्हणणारा नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळतो. गर्लफ्रेंडसाठी उतावळा असणाऱ्या नचिकेत आणि त्याच्या गोष्टीची झलक आपल्याला टीझरमधून पाहायला मिळते. (अमेय वाघ याच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाची पहिली झलक)
पहा टीझर:
काही दिवसांपूर्वी सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली. त्यात अमेयची गर्लफ्रेंड नेमकी कोण असणार, ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. टीझरमधूनही हे गुपित न उलघडल्याने आता ट्रेलरची प्रतिक्षा करावी लागणार आहे. उपेन्द्र सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.