मराठीतील सिनेसृष्टीतील नटखट, अवली अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) 'फास्टर फेणे', 'मुरांबा' या सिनेमांनंतर आता नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) असे या सिनेमाचे नाव असून सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या फर्स्ट लूकमध्ये अमेय वाघ दिसत आहे तर त्याच्या बाजूची गर्लफ्रेंडची जागा मोकळी दिसत आहे. म्हणजेच सिनेमाची अभिनेत्री कोण हे अद्याप गुलदस्तातच ठेवण्यात आले आहे.
या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत अमेयने लिहिले की, "हा नचिकेत प्रधान! मुलीसाठी नाव सुचवा म्हणालो, ते ह्याच्यासाठी. गर्लफ्रेंडचं नाव सांगा म्हणालो, तेही ह्याच्यासाठी. जगातल्या सगळ्या सिंगल पोरांना पडलेला एकच प्रश्न, 'गर्लफ्रेंड'!"
सिनेमाची पहिली झलक:
यावरुन सिनेमात अमेय नचिकेत वाघ ही व्यक्तिरेखा साकारत आहे, हे स्पष्ट होते. तर काही दिवसांपूर्वी अमेयने मुलीसाठी नाव सुचवा, हा खटाटोप नेमका कशासाठी केला होता, हे ही लक्षात येते. मात्र या सिनेमात अमेयची जोडी कोणाबरोबर जमणार, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. (अमेय वाघ झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये; अर्शद वारसी सोबत करणार ‘असुरा’गिरी)
उपेन्द्र सिधये यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.