अमेय वाघ झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये; अर्शद वारसी सोबत करणार ‘असुरा’गिरी
अभिनेता अर्शद वारसी आणि अमेय वाघ | (Photo courtesy: Twitter)

मराठी चित्रपटसृष्टीतील युवा अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh)आपल्या चाहत्यांना लवकरच एक खूशखबर देत आहे. मराठीतील अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अमेय आता हिंदी वेब ससीरिजमधून (Hindi web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती स्वत: अमेयनेच सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरुन  दिली होती. अमेयच्या नव्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच अमेयने पुन्हा एकदा नवी घोषणा केली आहे. त्यामुळे अलिकडील काळात त्याच्याकडून चाहत्यांना बसलेला हा आनंदाचा दुसरा धक्का आहे.

डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित 'असुरा' (ASURA) असे या वेबसीरीजचे नाव आहे. वूट ऍपवर प्रदर्शित होणारी ही एक थ्रिलर गोष्ट आहे. या वेबसीरिजमध्ये अमेय महत्त्वाची भूमिका साकारत आहे. थ्रिलर वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अमेयचा हा पहिलाच अनुभव आहे. हिंदीमधील नावजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या 'असुरा' या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi) प्रमुख भूमिका साकारत आहे. (हेही वाचा, अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी, मिथिला पालकर, अभिनय बेर्डेने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान)

वेबसीरिजच्या माध्यमातून अमेय आणि अर्शद दोघेही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या दोघांच्या रुपाने हिंदीतील अभीनेता आणि मराठी अभिनेता अशी तरुण कलाकारांची जुगलबंदी दोघांच्याही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आपल्या भूमिकेबाबत अमेय फारच उत्सुक आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीला अमेय आपल्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज देणार आहे. पण, हे सरप्राईज अमेयने खास नववर्षासाठी राखून ठेवले आहे. त्यामुळे ते नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस तरी प्रतिक्षा करावी लागणार आहे.