Daughter-in-Law of Shivaji Satam: सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा सविस्तर
Shivaji Satam (PC-Wikimedia Commons)

Daughter-in-Law of Shivaji Satam: सीआयडी फेम अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. परंतु, त्यांनी सीआयडी मालिकेत केलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरली आहे. जवळपास वीसहून अधिक वर्ष या मालिकेने लोकांना वेड लावलं होतं. या मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीत, दया हे पात्र देखील खूप गाजले होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

शिवाजी साटम यांच्या मुलाचे नाव अभिजित साटम आहे. अभिजितने 'हापूस' या मराठी चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय त्याने इतर मराठी चित्रपटातदेखील काम केलं आहे. तुम्हाला अभिजित हा शिवाजी साटम यांचा मुलगा आहे हे माहित असेल. परंतु, शिवाजी साटम यांच्या सुनबाईदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. (वाचा -Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरच्या हळदी मध्ये नवरदेवच थिरकला वाजले की बारा.. वर (Watch Video))

मधुरा वेलणकर ही शिवाजी साटम यांची सुनबाई आहे. मधुराने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मधुराला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मधुराने मालिकांशिवाय अनेक चित्रपटात काम केलं आहे. अभिजित हा मधुराचा पती आहे. विशेष म्हणजे मधुराचे वडीलदेखील उत्तम अभिनेते आहेत. त्यांचे नाव प्रदीप वेलणकर असं आहे. प्रदीप वेलणकर यांनी अनेक मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधुराने अखंड सौभ्याग्यवती, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार, गिलटी, गुमनाम है कोई (नाटक), गोजिरी, जन गण मन, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पाऊलवाट, मातीच्या चुली, मी अमृता बोलतेय, मेड इन चीन, रंगीबेरंगी, सरीवर सरी, हापूस, क्षणो क्षणी आदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.