सुपरहिट 'बॉईज' सिनेमाचा सिक्वेल लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. तरुणाईच्या या सिनेमातही जबरदस्त धमाल पाहायला मिळणार आहे. 'बॉईज 2' या सिनेमाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला.
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पर्दापण करणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर बेतलेल्या या सिनेमात प्रेम, रोमान्स तर आहेच पण त्याचबरोबर वैर, वाद, राडे देखील पाहायला मिळणार आहेत.
पहा सिनेमाचा तुफानी ट्रेलर...
या सिनेमात ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवोदीत कलाकार आहेत. त्याचबरोबर यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील हे कलाकार देखील आहेत.
रॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे.
जागतिक स्तरावर सिनेमाचे वितरण होणार असल्याने 'बॉईज 2' ची धमाल प्रेक्षकांना परदेशातही अनुभवता येईल.