Bhaai - Vyakti Kee Valli Trailer : पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर झळकणार, दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा
Bhai -Vyakti Kee Valli ( Photo Credits: Youtube)

Bhaai - Vyakti Kee Valli Trailer :  महाराष्ट्राचं लाडकं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल. देशपांडे(P.L. Deshpande) . यंदाचं वर्ष हे पु ल देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. पु. ल देशपांडे या व्यक्तीमध्ये साहित्यिक, अभिनेता, संगीतकार, वक्ता, विचारवंत अशा अनेक वल्ली बाजू होत्या. त्यामुळे रूपेरी पडद्यावर पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे 'भाई- व्यक्ती की वल्ली' (Bhaai - Vyakti Kee Valli) या मराठी सिनेमातून पहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  यांनी पु.ल देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व रूपेरी पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

भाई - व्यक्ती की वल्ली या सिनेमात पु.ल देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता सागर देशमुख झळकणार आहे तर सुनिताबाई देशपांडे या पु ल देशपांडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री इरावती हर्षे आहे. बालवयातील पु ल देशपांडे यांची भूमिका सक्षम कुलकर्णी याने साकारली आहे. Bhai - Vyakti Ki Valli सिनेमाचा पहिला टीझर  

भाई - व्यक्ती की वल्ली या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये स्वच्छंदी जगलेल्या पु ल देशपांडे यांच्या वैयक्तित आयुष्यातील काही प्रसंगाची झलक पहायला मिळते. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा सिनेमा 4 जानेवारी 2019 ला सिनेमाचा पुर्वाध तर 8 फेब्रुवारीला सिनेमाचा उत्तरार्ध प्रदर्शित होणार आहे प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सचिन खेडेकर, अभिजीत चव्हाण,सारंग साठ्ये  हे कलाकार खास भूमिकेत दिसणार आहेत.