Bhai - Vyakti Ki Valli Official Teaser : अभिनेता सागर देशमुख साकारणार पु ल देशपांडे !
भाई व्यक्ती की वल्ली photo credit : youtue

मराठी साहित्य विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. ८ नोव्हेंबर ही पु लं यांची जयंती. आजपासून देशभरात पु लं देशपांडे यांच्या शतकीजन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे.या दिवसाचं औचित्य साधून पु ल देशपांडे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य दिग्दशर्क महेश मांजरेकर यांनी पेलले आहे. आज त्यांच्या जीवनपटाचा भाई - व्यक्ती की वल्ली या सिनेमाचा पहिला वाहिला टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

पु ल देशपांडे यांच्या बहू आयामी व्यक्ती मत्त्वाचे पैलू सिनेमातून उलगडले जाणार आहेत. या सिनेमात अभिनेता सागर देशमुख पु ल . देशपांडेची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षे पु ल यांची पत्नी सुनीताबाई यांची भूमिका साकारणार आहे. सागर देशमुख याने वाय झेड या धमाके दार सिनेमातून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. टीझरमधेही केवळ सागराचा लूक दाखवण्यात आला आहे.

भाई - व्यक्ती की वल्ली हा सिनेमा ४ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. अभिनेता अभिजित चव्हाण  प्र . के. अत्रे यांची भूमिका साकारत आहे.