भाई- व्यक्ती की वल्ली (Photo Credit: Youtube)

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, कलाकार असे महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पु. ल. चे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधत पु. ल. देशपांडे यांचा जीवनपट महेश मांजरेकर रुपेरी पडद्यावर साकारत आहेत. 'भाई-व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचा पहिला टीझर 8 नोव्हेंबरला त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला. आता सिनेमाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पाहा पहिला टिझर : व्हिडिओ

या सिनेमात अभिनेता सागर देशमुख पु.ल. च्या भूमिकेत दिसणार आहे. तर बालपणीचे पु.ल. साकारण्याचा मान अभिनेता सक्षम कुलकर्णीला मिळाला आहे. 'पक पक पकाक', 'दे धक्का', 'काकस्पर्श' यांसारख्या सिनेमातून त्याचबरोबर अनेक मालिकांमधून आपण सक्षमचा अभिनय पाहिला आहे.

पाहा सिनेमाचा दुसरा टीझर-

'भाई - व्यक्ती की वल्ली' हा सिनेमा 4 जानेवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्र . के. अत्रे यांची भूमिका अभिनेता अभिजीत चव्हाण साकारत आहे. महेश मांजरेकर यांच्या 'फाळकेज् फॅक्टरी' या संस्थेअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.