
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf Padma Shri) यांना यंदाच्या पद्म पुरस्कारात पद्मश्री सन्मानाने (Padma Awards 2024) गौरवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते मंगळवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या दुसऱ्या नागरी सत्कार समारंभात 68 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहेच. हा सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (25 जानेवारी) एकूण 139 जणांची पद्म पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. या आधी, 28 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्कार समारंभात राष्ट्रपतींनी 71 व्यक्तींचा गौरव केला होता. उर्वरित 68 जणांना मंगळवारी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अशोक सराफ यांच्यासह अनेक क्षेत्रांतील पद्मश्री सन्मानित
पद्मश्री पुरस्काराने सन्मानितांच्या यादीत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक लक्ष्मण सराफ यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. त्यांच्यासह पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्यांमध्ये फुटबॉलपटू आय. एम. विजयन, गायिका अश्विनी भिडे देशपांडे, मुखवटेकार रेबा कांता महंता, आणि संगीतकार रिकी ग्यान केज यांचाही समावेश आहे.
पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कारानेही मान्यवरांचा सन्मान
पद्मविभूषण, जो देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तो माजी सरन्यायाधीश जगदीश सिंग केहर यांना सार्वजनिक सेवेसाठी प्रदान करण्यात आला. प्रख्यात कथक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया आणि लोकगायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5: ‘घे पाऊल पुढे जरा’ गाण्यावर वर्षा उसगांवकर यांनी स्वप्निल जोशी आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत केला डान्स (Watch Video))
पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्यांमध्ये नर्तिका व अभिनेत्री शोभना चंद्रकुमार, उद्योजक नल्ली कप्पुस्वामी चेट्टी, पुरातत्त्ववेत्ता कैलाश नाथ दीक्षित, नर्तक जतिन गोस्वामी, अभिनेता अनंत नाग, आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे. अर्थतज्ज्ञ बिबेक देब्रॉय आणि माजी मुख्यमंत्री तथा लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव
पद्म पुरस्कार कला, समाजकार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान व अभियांत्रिकी, उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य व शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा अशा अनेक क्षेत्रांतील व्यक्तींच्या कार्याची दखल घेत सन्मानित करतात.
अशोक सराफ यांची प्रतिक्रिया
#WATCH | Delhi: On being conferred with the Padma Shri, actor Ashok Laxman Saraf says, "It is a matter of great happiness and this honour means a lot to me. This award is a high honour. I am glad that I was considered for this award, it means that I have actually done something… pic.twitter.com/iPXZbkn4x5
— ANI (@ANI) May 27, 2025
पद्मविभूषण हे अत्यंत उल्लेखनीय सेवेबद्दल, पद्मभूषण उच्च दर्जाच्या सेवेबद्दल, तर पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जातो.
पद्म पुरस्कार सर्वांसाठी खुले
1954 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. कोणत्याही जाती, व्यवसाय, पद किंवा लिंगाचा भेद न करता सर्व नागरिकांना हे पुरस्कार मिळू शकतात. ज्यामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, दुर्बल घटक, दिव्यांग व्यक्ती आणि समाजासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न असतो.