Ashi Hi Banwa Banwi Remake: अशी ही बनवाबनवी चा रिमेक येणार का? सचिन पिळगावकर यांंनी दिलंं 'हे' उत्तर
Ashi hi Banwa Banwi | (Photo Credits- Facebook)

मराठी सिनेमांंसाठी माईल स्टोन मानला जाणारा सिनेमा म्हणजेच अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi) जर का पुन्हा नव्या ढंगात पाहायला मिळाला तर? तुम्हा आम्हा सारख्या हजारो मराठी चित्रपटांंच्या चाहत्यांंसाठी ही आनंदाची बातमी ठरेल, बरोबर ना? मात्र या सिनेमाच्या दिग्दर्शकांंनी म्हणजेच सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar)यांंनी अलिकडेच एका फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन बनवा बनवीचा रिमेक अजिबात बनवणार नसल्याची ठाम भुमिका मांंडलीये. त्यासाठी सचिन यांंनी कारणही तितकचंं समर्पक मांंडलं आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक फॅनच्याच्या मते बनवा बनवी हा सिनेमा क्लासिक लेजंड आहे आणि त्याला मोडुन तोडुन रिमेक करणं हा त्याच्याशी खेळ होईल म्हणुनच आपण अशी ही बनवा बनवीचा रिमेक बनवु इच्छित नाही असे सचिन यांनी म्हंंटले आहे. अशी ही बनवाबनवी या सिनेमाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

सचिन पिळगावकर यांंनी फक्त मराठी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातुन आपल्या फॅन्सशी संवाद साधला होता. एका चाहत्याने त्यांना अशी ही बनवाबनवीचा रिमेक बनवणार का असा सवाल केला, ज्यावर उत्तर देताना ते म्हणतात की, " आपण ‘लेजंड्स’ गोष्टींना हात लावू नये. आगीशी कधीच खेळू नये. नाहीतर मग त्याची तुलना केली जाईल आणि मग मलाच शिव्या खाव्या लागतील. ते जे आहे ते राहू द्यायचं. ताजमहाल संगमरवरी दगडांनी बनवलेला आहे. त्याला एखादी जरी विट लागली तर त्याचं सौंदर्य निघून जाणार. त्यामुळे अशी ही बनवाबनवी ज्या काळात बनला, ती वेळ, परफेक्ट कास्टिंग, लेखक वसंतराव सबनीस आणि प्रत्येक गोष्टीची भट्टी जमली.  हिंदीतही अनेकांनी रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते तोंडावर आपटले. त्यामुळे आपण रिमेक बनवू नये असं मला वाटतं.” बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे ५ ब्लॉकबस्टर मराठी सिनेमे.

दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला आता जवळपास 32 वर्षे झाली आहेत, अजुनही या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाहीये, त्यातील जाऊ बाई..नका ओ बाई इतक्यात जाऊ, धनंजय माने इथेच राहतात का?, 70 रुपये वारले यांंसारखे डायलॉग नव्या पिढीतही कमाल जादु दाखवत आहेत यावरुन अनेक मीम्स ही आपण पाहिले असतील, थोडक्यात काय तर हा चित्रपट सोनं आहे तुम्ही अजुनही पाहिला नसाल तर नक्कीच तुम्ही काही तरी मिस करताय!