मराठी सिनेमा हा त्याच्या दर्जेदार विषयांमुळे, सादर करण्याच्या हटके स्टाईलमुऴे कायम चर्चेमध्ये राहतो. आज मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोहचला आहे. २०१८  हे साल देखील मराठी सिनेमासाठी खास ठरलं आहे. कमाईच्या दृष्टीनेही तो उत्तम कामगिरी करतोय. हिंदी सिनेमाप्रमाणे सारेच सिनेमे १०० कोटी क्लबमध्ये नसले तरी बॉक्सऑफिसवर गल्ला जमावण्याच्या यादीमध्ये कोणते सिनेमे अव्वल स्थानी आहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का

सैराट  

मराठी सिनेसृष्टीमध्ये सैराट या एकमेव सिनेमाने १००  कोटींचा गल्ला जमावला आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे.  आर्ची आणि परशाची अल्लड वयातील प्रेमकहाणी, कालांतराने त्यांच्या आयुष्यात येणारे बदल रसिकांना खिळवून ठेवणारे आहेत.  मराठीतील यशानंतर त्याचे इतर भाषांमध्येही रिमेक करण्यात आलेत. सहा आठवड्यात महाराष्ट्रातील 525 स्क्रिन्सवर सैराट झळकला. यादरम्यान सैराटने 82.95 कोटी कमावले.  सैराटचं वर्ल्डवाईड कलेक्शन 110 कोटी आहे.  

नटसम्राट

नटसम्राट या मूळ शेक्सपिअर लिखीत नाटकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला. सुरुवातीला नाटक आणि त्यानंतर सिनेमाच्या माध्यमातून ही कलाकृती रसिकांच्या भेटीला आला होता. महेश मांजरेकर  दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबतीने विक्रम गोखले, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, नेहा पेंडसे आदी कलाकारांची तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. नटसम्राट सिनेमाचं बजेट 7 कोटी होते. मात्र रिलीजनंतर या सिनेमाने 48 कोटीचा गल्ला जमावला. म्हणजेच सिनेमाला एकूण 600% प्रॉफीट झाला आहे.

लय भारी

लय भारी हा निशिकांत कामत दिग्दर्शित आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत असलेला पहिला कर्मेशिएल मराठी सिनेमा आहे. यामध्ये ड्रामा, अ‍ॅक्शन आणि कॉमेडेची पुरेपूर तडका होता. मराठी सिनेमात अभिनयात पदार्पण करणार्‍या रितेशच्या 'लय भारी'ला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. या सिनेमाने 40 कोटींचा गल्ला जमावला आहे.

कट्य़ार काळजात घुसली

कट्य़ार काळजात घुसली हे अजरामर संगीत नाटक आहे. या नाटकातील पदं आजही लोकांच्या ओठांवर आहेत. अभिनेता सुबोध भावेने या नाटकाला सिनेमात बदलण्याचे शिवधनुष्य पेलले. २०१५ च्या दिॆवाळीत  आलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर ४० कोटींहून अधिकचा गल्ला जमावला आहे.

टाईमपास  

केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब या जोडीचा 'टाईम्पास' सिनेमा ही अल्लड वयातील हटके प्रेमकहाणी होती. पहिलं प्रेम आणि सारी बंधन झुगारून ते स्विकारण्याचं धाडस या सिनेमामध्ये नवख्या कलाकारांनी उत्तमपणे मांडली होती. या सिनेमाने 33 कोटींचा गल्ला जमावला आहे.