Ankush Chaudhari (Photo Credits: Instagram)

देशाभोवती अधिकाधिक आवळत चाललेला कोरोनाचा फास मुळासकट काढण्यासाठी शासनासह सर्व देशवासिय योग्य ती काळजी घेत आहे. कोविड योद्धा देखील दिवसरात्र एक करुन ही स्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अनेक कलाकारही पुढे सरसावले असून सोशल मिडियाद्वारे ते आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देत आहे. दरम्यान मराठीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) याने आपल्या एका पोस्टद्वारे नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच हे आवाहन करण्यासाठी त्याने 'दुनियादारी' (Duniyadari) चित्रपटातील लोकप्रिय डायलॉगचा वापर केला आहे.

अंकुश चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांच्या ‘दुनियादारी’ चित्रपटात साकारलेले ‘दिग्या’ आणि ‘श्रेयस’ दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरमधल्या दिग्या आणि श्रेयसने तोंडावर मास्क घातलेले दाखवले आहेत. अभिनेता अंकुश चौधरीचा गाजलेला ‘दुनियादारी’ चित्रपटातला डायलॉग ही यात लिहिलाय. ‘तेरी मेरी यारी…अगोदर मास्क घालू मग दुनियादारी !….असं या पोस्टमध्ये लिहीलं आहे.हेदेखील वाचा- COVID वर यशस्वीरित्या मात केलेला अभिनेता Milind Soman कोरोना रुग्णांसाठी पुढील 10 दिवसांत करणार 'हे' महत्त्वाचे काम

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

अभिनेता अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टरवर अभिनेता स्वप्निल जोशीने ही कमेंट केलीय. ‘दिग्या बोलला म्हणजे बोलला…’ असं त्याने या कमेंटमध्ये लिहिलंय.

त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांना अंकुशची ही स्टाईल आवडली त्याने दिलेला संदेश प्रचंड व्हायरल झाला आहे. अभिनेता अंकुश चौधरी त्याच्या आगामी ‘लॉकडाउन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची देखील भूमिका पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगदेखील पुर्ण झालं असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.