Girlfriend Teaser 2: सई ताम्हणकर हिच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवणारा 'गर्लफ्रेंड' सिनेमाचा टीझर आऊट
Girlfriend Marathi Movie (Photo Credits: Youtube)

मराठी अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) याच्या 'गर्लफ्रेंड' (Girlfriend)  सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चा आहे. सुरुवातील अमेयची गर्लफ्रेंड कोण, यामुळे ताणलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली असली तरी सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य आहे. त्यात विशेष म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमेय वाघ ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

सिनेमाचा एक टीझर यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता सिनेमाचा दुसरा टीझर आऊट झाला आहे. यात सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा कशी असेल, याची झलक पाहायला मिळते. अमेयच्या आवाजातील या टीझरमध्ये सई ताम्हणकर मस्ती करताना दिसत आहे.

पहा टीझर

नचिकेत आणि अलिशा या दोघांची केमिस्ट्री आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा 26 जुलै रोजी रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले आहे. तर निर्मिती रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची आहे.