नकटीच्या डोक्यावर विघ्नांचा भार, डिझायनरला मारहाण केल्याने प्राजक्ता माळी विरोधात कोर्टात तक्रार
प्राजक्ता माळी (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

छोट्या पडद्यावरील सोज्वळ भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी  (Prajakta Mali) हिला खऱ्या आयुष्यातं दबंगगिरी करणं चांगलंच अंगाशी आलंय. काही दिवसांपूर्वी शुल्लक वादावरून प्राजक्ताने आपल्या फॅशन डिझायनरला मारहाण व शिवीगाळ केल्याचे समोर आले होते, या विरोधात डिझायनर जान्हवी मनचंदा हिने ठाण्याच्या (Thane)  काशिमिरा पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, मात्र एवढ्यावरच न थांबता आता मनचंदा यांनी प्राजक्ताला कोर्टात खेचण्याची तयारी दाखवली आहे. मनचंदा यांनी ठाणे न्यायालयात केलेल्या तक्रारीची दखल घेत प्राजक्ताच्या विरोधात न्यायालयाने कलम 506 (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येत्या 26 जूनला याबाबत सुनावणी असून त्यावेळी प्राजक्ताला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माध्यमांच्या माहितीनुसार, यापूर्वी एप्रिल मध्ये जान्हवी मनचंदा व प्राजक्ता मध्ये एका कार्यक्रमाच्या सेट वर कपड्यांवरून वाद झाला होता, डिझायनर ड्रेसमध्ये प्राजक्तानी कात्री घेऊन छेडछाड केली व यावरून तिला विचारणा केल्यावर तिने भांडायला सुरवात केली त्यानांतर सगळं राग आपल्यावर काढत प्राजक्तानी व्हॅनिटी व्हॅन मध्ये बोलवून मारहाण व शिवीगाळ केली अशी माहिती जान्हवी यांनी दिली आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने फॅशन डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार

या प्रकाराबाबत काशिमिरा पोलीस स्टेशन वर तक्रार केल्यावर पोलिसांनी प्राजक्ता माळीच्या विऱोधात कलम 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी देखील प्राजक्ताचा स्वभाव रागीट असल्याने वाद झाले होते मात्र तिनेच आपल्याला काम दिल्याने आजवर सहन करत राहिले, यावेळी परिस्थिती हाता बाहेर गेली असल्याने हे पाऊल उचलायला लागत आहे असे जान्हवी यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितले.

कास्टिंग काऊच प्रकरणी श्रुती मराठे हिने निर्मात्यांना शिकवला धडा, सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

दुसरीकडे प्राजक्ताने मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा करत आपण मारहाण केलीच नाही असे म्हंटले आहे. आमच्यात वाद झाला पण त्यावेळी जान्हवीने स्वतःच स्वतःला इजा करत नंतर माझ्याबद्दल ही खोटी तक्रार केली असेही प्राजक्ता सांगतेय. या बाबत कोर्टात सुनावणी झाल्यावर सत्य काय ते बाहेर येईलच पण तूर्तास या प्रकारामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या नकटीच्या डोक्यावर विघ्नांचा भार वाढणार आहे हे नक्की!