कास्टिंग काऊच प्रकरणी श्रुती मराठे हिने निर्मात्यांना शिकवला धडा, सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना
श्रुती हिने जेव्हा ती एका चित्रपटासाठी मुख्य भुमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या सोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रकाराचा खुसाला या पोस्टमधून केला आहे.
अभिनेत्री श्रुती मराठे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मधील दिग्गज अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) हिने ह्युमन ऑफ बॉम्बे (Human Of Bombay) यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये श्रुती हिने जेव्हा ती एका चित्रपटासाठी मुख्य भुमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या सोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रकाराचा खुसाला या पोस्टमधून केला आहे.
तनुश्री दत्ता हिने सुरु केलेल्या मीटू (#MeToo) या मोहिमेनंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या सोबत घडलेल्या कास्टिंग काऊचबद्दलचे किस्से उघडपणे सोशल मीडियावर मांडलेले दिसून आले होते. तर आता श्रुती हिने सुद्धा एका निर्मात्यांविरुद्ध त्यांचे नाव न घेता त्यांनी तिच्यासोबत केलेल्या वर्तवणुकीचा खुलासा केला आहे. श्रुती असे म्हणते की, माझ्या इंटरव्हूवच्या वेळी निर्मात्यांनी 'समजुतीपणा' आणि 'वन नाईट स्टँड' सारख्या शब्दांचा उच्चार करत चित्रपटात काम देण्यासाठी विचारण्यात आले होते. परंतु श्रुती हिने निर्मात्यांना या प्रकरणी प्रतिउत्तर करत त्यांना धडा शिकवला. तसेच काही जणांनी श्रुती हिला तो प्रोजेक्ट करु नको असे सुद्धा सांगितले होते.(हेही वाचा-#MeToo : निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा, असिस्टंट डिरेक्टरचा आरोप)
ज्या दिवशी माझ्यासोबत कास्टिंग काऊचचा प्रकार घडला त्यावेळी माझ्याकडे सर्व काही होतेच. परंतु निर्भिडपणे या प्रसंगाला सामोरे जात एका महिलेच्या रुपाने विचार करुन या प्रकरणाला योग्य न्याय दिला. तसेच दुष्ट विचार असणाऱ्या कलाकारांबद्दलसुद्धा श्रुती उघडपणे बोलली आहे. तर अभिनेते आरामात जीवन जगतात अशा शब्दांत त्यांची कानउघडणी केली आहे.
तसेच एका साउथ भाषेतील चित्रपटाचा उल्लेख करत श्रुती हिने असे म्हटले आहे की, माझा बिकनीवरील फोटो काढण्यात आला. ही गोष्ट टेलिव्हिजनवर प्रसिद्धी मिळाल्यानंतर झाली होती. तर बिकनी सीनसाठी श्रुतीने कोणताही विचार न करता होकार दिला होता. कारण अशा पद्धतीची भुमिका करणे ही खुप मोठी गोष्ट असल्याचे श्रुती हिने म्हटले आहे. परंतु या बिकनीच्या रुपातील फोटोमुळे मला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यामुळे आत्मविश्वाला तडा गेल्याची भावना सुद्धा श्रुती हिने सांगितली आहे.