
मराठी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) हिने एका फॅशन डिझायनरला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर काशिमीरा पोलीस ठाण्यात प्राजक्ता हिच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
कार्यक्रमादरम्यान देण्यात येणारे कपडे योग्य नसल्याच्या कारणावरुन प्राजक्ता हिने जान्हवी मनचंदा नावाच्या डिझायनरला मारहाण केली आहे. तर या दोघींच्या व्हॉट्सअॅप चॅटचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु प्राजक्ता हिने या आरोपाला नकार दिला असून आमच्या दोघांत वाद झाले असल्याची कबुली तिने दिली आहे. मात्र मनचंदा हिला मारहाण केली नसून माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे प्राजक्ता हिने म्हटले आहे.
तर प्राजक्ता हिच्यावर मनचंदा हिने केलेल्या आरोपानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राजक्ता यापूर्वी जुळून येती रेशीम गाठी, हम्पी, संघर्ष या चित्रपटातून झळकली आहे.