Madhuri मराठी सिनेमा या '5' कारणांसाठी पहायला पाहिजे !
Madhuri Marathi film (Photo Credit : Facebook)

Madhuri Marathi Movie : उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)  हे मराठमोळं नाव हिंदी सिनेमात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये झळकले होते. मात्र आता उर्मिला मराठी सिनेमांच्या (Marathi Cinema)  निर्मिती क्षेत्रामध्येही उतरली आहे. माधुरी  (Madhuri) या आज (30 नोव्हेंबर) रिलिज झालेल्या सिनेमाची निर्मिती उर्मिला मातोंडकरची आहे. सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkerni)  प्रमुख भूमिकेत आहे. सोनाली सोबतच शरद केळकर (Sharad Kelkar) ,संहिता जोशी, विराजस कुलकर्णी या सिनेमामध्ये झळकणार आहे. मग या विकेंडला 'माधुरी' सिनेमा (Madhuri Cinema)  का पहावा? हा प्रश्न पडला असेल तर हे नक्की वाचा आणि पहा प्लॅन बनतोय का ?

एका महिलेची कहाणी सांगणारा महिलेच्या नजरेतून सिनेमा

माधुरी सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे - जोशी यांनी केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत केवळ दिग्दर्शिका असलेल्या महिला दिग्दर्शिका अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वप्ना ! माधुरी सिनेमामध्ये मुख्य नायिका प्रौढ आणि विशीतील मुलगी असा तिच्या जीवनात प्रवास करतेय..

सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एरवी सोज्वळ, सालस भूमिकेतुन रसिकांच्या भेटीला येते. मात्र 'माधुरी' सिनेमामध्ये सोनाली एका वेगळ्या अंदाजात रसिकांच्या भेटीला आलीआहे. ग्लॅमरस अंदाज, कूल स्टाईल असली तरीही या सिनेमात सोनाली एका दुर्मिळ आजाराशी लढत आहे. यामध्ये तिला तिच्या वयाचा विसर पडतो. तिच्या या सवयीमुळे काय काय घडतं हे पाहणं हीच सिनेमाची गंमत आहे.

अवधूत गुप्तेची गाणी

उडत्या चालीची किंवा फ्युजन स्टाईलने गाणी बनवणं ही अवघूत गुप्तेची ओळख आहे. पण अवधूत गुप्तेचा सॉफ्ट म्युझिकचा अंदाज पाहायचा असेल तर 'माधुरी'मधील हे एक गाणं नक्की पहायला हवं.

 

उर्मिला मातोंडकर मराठी सिनेमात

उर्मिला मातोंडकरने हिंदी सिनेमा गाजवला आहे. मात्र 'माधुरी'च्या माध्यामातून उर्मिला मराठी सिनेमाकडे वळली आहे. यासिनेमाची निर्मिती उर्मिला मातोंडकर आणि तिच्या पतीने म्हणजेच मोहसीन अख्तरने केली आहे. Video : 'माधुरी' सिनेमातून उर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठीत पाऊल

स्वप्ना वाघमारे - जोशीच्या मुलीचं पदार्पण

अगदी अल्पावधीतच स्वप्ना स्वप्ना वाघमारे - जोशीने वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे केले आहेत. स्वप्ना वाघमारे - जोशी यांनी 'माधुरी' सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. पण 'माधुरी' सिनेमातून स्वप्ना यांची मुलगी संहिता मराठी सिनेमामध्ये पाऊल टाकत आहे. त्यामुळे तिच्याकडून रसिकांच्या अपेक्षा आहेत.

30 नोव्हेंबरपासून 'माधुरी' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तुम्हीही पहा आणि आम्हांला तुमचा रिव्ह्यु नक्की सांगा