Dream Girl Song Dhagala Lagali: रितेश देशमुख, आयुष्मान खुराना, नुसरत भरूचा यांच्या खास अंदाजात ड्रीम गर्ल सिनेमामधील 'ढगाला लागली..' चं रिमिक्स व्हर्जन रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
ड्रिम गर्ल

आपण नेहमी पाहतो की, मराठी चित्रपटात हिंदी आयटम साँग केले जाते, परंतु पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ड्रीम गर्ल (Dreams Girl) या हिंदी चित्रपटात मराठी साँग बघायला झळकणार आहे. मराठी चित्रपटाचे सुपरस्टार कलाकार दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटातील ढगाला लागली... या साँगवर रिमेक करण्यात आले आहे. या रिमेक साँगमध्ये रितेश देशमुख (Ritesh Deshmukh), आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) आणि नुसरत (Nusrat) हे कलाकार आयटम साँग करताना पाहायला मिळत आहे. अनेक लोकांनी या साँगला मोठी पसंती दाखवली आहे. येत्या सप्टेंबर महिन्याच्या 13 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रितेश देशमुख हा मराठी चित्रपटासाठी आपले योगदान देत असल्याचे समजते. अगामी चित्रपट ड्रिम गर्ल या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराणा याने मुख्य भूमिका साकरली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या चित्रपटात मराठी साँग झळकताना दिसणार आहे. तसेच आयुष्मान याची अनोखी कलाकारी अनुभवता येणार आहे. गायक मीका सिंह (Mika Singh), आणि ज्योतिका (Jyotika) या दोघांनी हे साँग गायले आहे. युट्यूबवरही लाखो लोकांनी या साँगला पसंती दर्शवली आहे. हे देखील वाचा-War Trailer: गुरु-शिष्याची जोरदार टशन घेऊन आलाय ऋतिक रोशन -टायगर श्रॉफ च्या 'War' चा धमाकेदार ट्रेलर

ड्रीम गर्ल सिनेमातील 'ढगाला लागली ... '

हे साँग पाहिल्यानंतर युट्युबवरील काही लोकांनी मराठी पाऊल पडते पुढे, अशी कमेंट केली आहे. तसेच काही लोकांनी गणपती बप्पा मोरया अशी देखील कंमेट केली आहे.