War Trailer: गुरु-शिष्याची जोरदार टशन घेऊन आलाय ऋतिक रोशन -टायगर श्रॉफ च्या 'War' चा धमाकेदार ट्रेलर
War Trailer (Photo Credits: YouTube)

अखेर तो ट्रेलर आलाच! गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला ऋतिक रोशन  (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) च्या 'वॉर' (War) या चित्रपटाचा अॅक्शनपॅक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील ऋतिक आणि टायगर चे स्टंट्स आणि अॅक्शन सीन्स हे अंगावर काटा आणतील इतके थरारक आहेत. त्यांच्या असंख्य चाहत्यांना अक्षरश: वेडं लावतील असेच हे स्टंट्स आहेत. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री वाणी कपूरचा (Vaani Kapoor) हा हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.

वॉर चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये ऋतिक रोशनला त्याच्या मिशनपासून रोखण्यासाठी त्याच्या बेस्ट विद्यार्थी टायगर श्रॉफची निवड केली जाते. यात बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा गुरु-शिष्यामध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे. यात ऋतिक आणि टायगरचा खूप हटके लूकही पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमधील सीन्स बघून ज्यांना अॅक्शन सिनेमाची आवड आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा पर्वणीच ठरणार आहे.

पाहा ट्रेलर:

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. वाणी कपूर चा ही यात हॉट लूक पाहून तिची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

यशराज फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात आशुतोष राणा, विनय पाठक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे सीन पोर्तुगालची सर्वात उंच टेकडीवर 'सेरा दा एस्ट्रेला' येथे चित्रित करण्यात आले आहे.