मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने शिवसेनेने अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक खुलासा व्हिडिओतून केला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी भाग्यश्री गेली असता तिथे तिला अयोग्य वागणूक मिळाली असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारणामुळे राजुरा विधानसभा संपर्क प्रमुखांनी माफी मागावी अशी मागणी भाग्यश्री हिने केली आहे.
इन्स्टाग्रामवर भाग्यश्री हिने एक व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे ती, नागपूर येथे विमानतळावर गेली असता तासभर उभे रहावे लागले. तरीही कोणाही कार्यक्रमास्थळी घेऊन जाण्यास आले नाही. मात्र काही माणसे तासाभरानंतर तिला घेण्यासाठी आले पण उशीर होईल असे कारण तिला फ्रेश होण्यास सुद्धा वेळ देऊ केला नाही. एवढेच नाही तर चंद्रपुरात राहण्यासाठी हॉटेल बुक केले असल्याते सांगण्यात आले. पण तेथे गेल्यावर बुकिंग झाले नसल्याचे समोर आले. यावर भाग्यश्री हिला एका साध्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करुन देण्यात आली. कार्यक्रमासाठी जो वेळ सांगितला होता त्यापेक्षा सुद्धा अधिक वेळ त्यांनी थांबण्यास भाग पाडले. मात्र त्या कार्यक्रमातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.(नेहा पेंडसे चा नवरा शार्दुल सिंह विषयी तुम्हाला माहित आहे का ही गोष्ट? ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील)
त्यानंतर घरी परतीसाठी रिटर्न तिकिट सुद्धा काढून देण्यात आले नाही. पण त्यांच्यासोबत भरपूर वाद घातल्यानंतर त्यांनी तिकिटाची सोय करुन दिली. फोन ही बंद करुन ठेवलाय यामुळे शिवसेनेचे राजुरा विधानसभेचे संपर्क प्रमुख मिथुन खोपडे हे जबाबदार असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाग्यश्री हिने व्हिडिओद्वारे केली आहे.