Paresh Rawal, Bharat Jadhav (Photo Credits: Twitter)

56th Maharashtra State Marathi Film Awards: मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कलावंतांचा दरवर्षी महराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा मुंबईत रंगणार्‍या 56 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा सुषमा शिरोमणी (Sushma Shiromani), भरत जाधव (Bharat Jadhav), परेश रावल (Paresh Rawal), वामन भोसले (Vaman Bhosale) या कलाकारांचा महराष्ट्र राज्य पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष  जॉन बेली (Jhon Baily) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

56 व्या  राज्य मराठी चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावं

  • परेश रावल - राज कपूर  विशेष योगदान पुरस्कार
  • वामन भोसले (ज्येष्ठ चित्रपट संकलक आणि अभिनेते) - राजकपूर जीवनगौरव पुरस्कार
  • सुषमा शिरोमणी (अभिनेत्री/निर्माती/ दिग्दर्शिका) -  चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
  • भरत जाधव - ‘चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचं ट्विट

मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी उद्या (26 मे) दिवशी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.जीवनगौरव पुरस्कार म्हणून विजेत्याला ५ लाख रूपये तर विशेष योगदान पुरस्कार म्हणून 3 लाख रूपये देऊन गौरव करण्यात येतो. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2019 च्या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.