Close
Advertisement
 
सोमवार, फेब्रुवारी 24, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये सासू आणि नवऱ्यासोबत पोहोचली कॅटरीना कैफ, येथे पाहा व्हिडीओ

बॉलिवूडमधील स्टार्स अनेकदा धार्मिक स्थळांवर हजेरी लावतात आणि यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या सासूसोबत कुंभमेळ्यात पोहोचली आहे. तत्पूर्वी अक्षय कुमारनेही संगमावर स्नान केले होते. सध्या कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती सासूसोबत पूजा करताना दिसत आहे. महाकुंभात पोहोचलेल्या कतरिना कैफने या वेळी पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. विक्की कौशलही कुंभमेळ्यात सहभागी झाला होता.

मनोरंजन Shreya Varke | Feb 24, 2025 04:35 PM IST
A+
A-
Maha Kumbh 2025

Maha Kumbh 2025: बॉलिवूडमधील स्टार्स अनेकदा धार्मिक स्थळांवर हजेरी लावतात आणि यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या सासूसोबत कुंभमेळ्यात पोहोचली आहे. तत्पूर्वी अक्षय कुमारनेही संगमावर स्नान केले होते. सध्या कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती सासूसोबत पूजा करताना दिसत आहे. महाकुंभात पोहोचलेल्या कतरिना कैफने या वेळी पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. विक्की कौशलही कुंभमेळ्यात सहभागी झाला होता. कतरिनाचा पती आणि बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नुकताच त्याच्या 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुंभमेळ्यात गेला होता. यावेळी तो म्हणाला, 'खूप छान वाटतंय. इथे येण्याच्या संधीची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आता आम्ही इथे आलो आहोत, त्यामुळे आम्ही खूप नशीबवान समजतो.' कतरिना कैफ  सासूसोबत धार्मिक स्थळांना भेट देत असल्याचे दिसून येत आहेत. काही काळापूर्वी ते शिर्डी साईबाबांच्या दर्शनालाही गेले होते. तिथले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ: 

कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट्स

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी लवकरच ती एका नव्या प्रोजेक्टद्वारे कमबॅक करत आहे.


Show Full Article Share Now