Luka Chuppi Trailer: पहा काय घडते जेव्हा कार्तिक आर्यन आणि क्रिति सेनन यांच्या लिव्हइनमध्ये सामील होते त्यांचे कुटुंब
लुका छुपी ट्रेलर (Photo Credit: YouTube)

Luka Chuppi Trailer: 2018 मध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) च्या चित्रपटाने 100 करोड क्रॉस केले, आणि रातोरात कार्तिक एकदम फार्मात आला. त्यानंतर तरुणाईला भुरळ पाडू शकतील अशा अनेक चित्रपटांसाठी त्याला विचारणा झाली. आता कार्तिकचा नवा चित्रपट येऊ घातला आहे. ‘लुका छुपी’ (Luka Chuppi) असे या चित्रपटाचे नाव असून, लग्नाआधी लिव्हइन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची कथा यात सांगितली आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिति सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मथुरा येथे या चित्रपटाची कथा घडते. कार्तिक हा एक लोकल टीव्ही रिपोर्टर असतो. जेव्हा तो क्रितिला प्रपोज करायला जातो त्यावेळी ती त्याला लिव्हइन मध्ये राहण्याची अट घालते. बिचारा कार्तिक प्रेमापोटी या गोष्टीला तयारही होतो. मात्र त्यानंतर त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत राहू लागते आणि जो काही गोंधळ उडतो तो पाहण्यात नक्कीच मजा येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून दिनेश विजन निर्माते आहे. 1 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी  ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ यांसारख्या चित्रपटांमधून कार्तिकने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर क्रितीच्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटानेही चांगलेच यश मिळवले होते.