भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 71 व्या वर्षात पदार्पण केलेल्या मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतातील राजकीय मंडळी, परदेशातून दिग्गज मान्यवर मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशामध्ये भारताची गानकोकीळा म्हणून ओळख असणार्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटर वर नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद देताना लता मंगेशकर यांनी त्यांचा उल्लेख 'नरेंद्रभाई' असा केला आहे.
दरम्यान लता मंगेशकर यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना,' नमस्कार, आदरणीय नरेंद्रभाई, तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ईश्वर तुम्हांला कायम यशस्वी बनवू दे, तुम्ही दीर्घायुषी व्हा हीच मंगलकामना! ' असा आशिर्वाद दिला आहे. Narendra Modi Birthday Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Whatsapp Status, Facebook वर शेअर करता येतील हे खास फोटो.
लता मंगेशकर यांचे ट्वीट
नमस्कार आदरणीय नरेंद्रभाई,आपको जन्मदिवस की बहुत बहुत शुभकामनाएँ. ईश्वर आपको सदैव यशस्वी करें,आप दीर्घायु हो यही मेरी मंगलकामना. @narendramodi
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) September 17, 2020
आशा भोसले ट्वीट
Adarniya Pradhan Mantri Narendra Modiji ke janam din par, unko meri bahut bahut shubhkamnayein. Deergha ayushaman rahiye, Bhagwan se yahi Prarthana hai. Jai Hind 🇮🇳 @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/U6QYdxnqkD
— ashabhosle (@ashabhosle) September 17, 2020
लता मंगेशकर यांच्या पाठोपाठ आशा भोसले यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यावेळेस त्यांनी मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी यांचे नातं बहीण-भावा प्रमाणे आहे. लता मंगेशकर रक्षाबंधनाच्या दिवशी देखील आर्वजून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देतात. बॉलिवूड क्षेत्रामध्ये आज नरेंद्र मोदींना शिल्पा शेट्टी, कंगना रनौत, मिलिंद सोमण आदी कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.