Narendra Modi Birthday Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Whatsapp Status, Facebook वर शेअर करता येतील हे खास फोटो
Narendra Modi Birthday (Photo Credits: File Image)

Narendra Modi Birthday Special: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचा आज 70 वा वाढदिवस आहे. आणि देशात मोदींंची फॅन फॉलोविंंग पाहता आज अनेकांंना आपणही मोदींंना शुभेच्छा द्याव्यात असे वाटत असल्यास काही वावगं ठरणार नाही. तुमची हीच इच्छा तुम्ही मोदींंना सोशल मीडियाच्या माध्यमातुन मॅसेज करत पुर्ण करु शकता. याशिवाय अलिकडे कोणाचा वाढदिवस असल्यास त्यांंचा फोटो ऑनलाईन स्टोरी, स्टेटस मध्ये पोस्ट करण्याची पद्धत बरीच फॉलो केली जाते अशाच प्रकारे जर तुम्हाला मोदींंना शुभेच्छा देणारे फोटो शेअर करायचे असल्यास त्यासाठी फार मेहनत लागु नये याची काळजी आम्ही घेतलेली आहे, खाली आपल्यासाठी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही फ्री टू डाउनलोड फोटो दिलेले आहेत ते आज आपल्या सोशल मीडियावरुन नक्की शेअर करु शकता, मोदी ऑनलाईन बरेच अ‍ॅक्टिव्ह असतात त्यामुळे तुम्ही या पोस्ट त्यांना टॅग करुन शेअर केल्यास उत्तर येऊ शकते याची शक्यता टाळता येत नाही.  Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचे हे दुर्मिळ फोटो कदाचितच कोणी पाहिले असतील

नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Narendra Modi Birthday (Photo Credits: File Image)
Narendra Modi Birthday (Photo Credits: File Image)
Narendra Modi Birthday (Photo Credits: File Image)
Narendra Modi Birthday (Photo Credits: File Image)

दरम्यान, मोदी आपला वाढदिवस धामधुमीत साजरा करत नाहीत मात्र त्यांंच्या वाढदिवसाचे निमित्त साधत भाजपकडुन अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंंदा सुद्धा मोदींंचा वाढदिवस सप्ताह हा सेवा सप्ताह म्ह्णून साजरा केला जात आहे, ज्या अंंतर्गत देशभरात मास्क वाटप, स्वच्छ भारत शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि असे उपक्रम राबवले जात आहेत.

नरेंद्र मोदी यांंचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला होता यंंदा ते वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, मोदींंबाबर विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात जन्मलेले ते पहिले वहिले पंंतप्रधान आहेत. 2014 पुर्वी केवळ गुजरात पुरतं मर्यादित असलेले नरेंद्र मोदी आज भारताची ओळख म्हणुन जगभर प्रसिद्ध आहेत. 2014 पासुन देशाची धुरा सांंभाळणार्‍या यशस्वी पंंतप्रधानांना लेटेस्टली कडुन सुद्धा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!