Happy Birthday AR Rahman: ए आर रेहमान यांच्या यशासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून आशीर्वाद
A R Rahman Birthday: Lata Mangeshkar, Shreya Ghoshal, Anil Kapoor Send Him Warm Wishes. (Photo Credit: Twitter)

Happy Birthday AR Rahman: संगितकार ए आर रेहमना (AR Rahman) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. भारतासह देशभरातील अनेक दिग्गज आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीही रेहमान यांना शुभेच्छा दिल्या आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक गाणे शेअर केली आहे. तसेच, अत्यंत मोजक्याच शब्दात रेहमान यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात लता मंगेशकर म्हणातत, रेहमान साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर कृपेने आपल्याला खूप यश मिळो, अशी माझी प्रार्थना.

गेली 26 वर्षे आर ए रेहमान हे नाव संगीतप्रेमींच्या हृदयावर राज करत आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी 1995मध्ये मॉरीशस नॅशनल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फर्स्ट वेस्ट अँड प्रॉडोक्शनसाठी लॉरेन्स अवॉर्ड्स, चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 2000मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्यप्रदेश सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कार, 15 वेळा फिल्मफेयर आणि फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Deepika Padukone Birthday Special: या 5 सिनेमांनी बदललं 'दीपिका पादुकोण'चं फिल्मी करियर!)

आर ए रेहमान यांना जागतिक संगित क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल 2006मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडूनही सन्मानित करण्यात आले. 2009मध्ये आलेला चित्रपट 'स्लमडॉग मिलेनिय' या चित्रपटातील संगीताबद्दल त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाची दखल ऑस्करनेही घेतली होती.या चित्रपटातील संगितासाठी ऑस्करने रेहमान यांना सन्मानित करण्यात आले होते.