Deepika Padukone Birthday Special: या 5 सिनेमांनी बदललं 'दीपिका पादुकोण'चं फिल्मी करियर!
Deepika Padukone Birthday (Archived and representative images)

Deepika Padukone Birthday Special:  अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदाचा बर्थ डे दीपिकासाठी खूपच खास आहे कारण यंदा लग्नानंतरचा तिचा पहिला बर्थ डे आहे. 2018 हे वर्ष दीपिकासाठी प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही टप्प्यांवर खूपच खास ठरलं आहे. वर्षभरात तिने अनेक चढ उतार बघितले. नैराश्यावर मात करून जगासमोर तितक्याच आत्मविश्वासाने उभी राहिलेली दीपिका तिच्या फिल्मी करियरमध्येही अगदी चोखंदळपणे भूमिका निवडते. तरुण पिढीच्या अभिनेत्रीमध्ये दीपिकाची स्पर्धा आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा अशा अभिनेत्रींसोबत आहे. मग पहा बॉलिवूडच्या या 'मस्तानी'चे फिल्मी करियरमधील महत्त्वाचे चित्रपट कोणते ?

दीपिकाच्या करियरमध्ये टर्निंग पॉईंट ठरले हे सिनेमे

पद्मावत -

सिनेमाच्या शूटिंगपासून प्रदर्शनापर्यंत 'पद्मावत' या सिनेमाला अनेक त्रास सहन करावे लागले. राणी पद्मावती ही प्रमुख भूमिका दीपिकाने या सिनेमामध्ये साकारली आहे. या सिनेमाने बॉक्सऑफिसवरही बक्कळ कमाई केली. दीपिकाच्या करियरमधील हा एक सुपरहीट सिनेमा आहे. या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक . झालं सोबटाच सिनेमाला विरोध करणाऱ्या संस्थाकडून मिळणाऱ्या धमक्या, शेरेबाजी या साऱ्याशी तिने सामंजस्याने दोन हात केले.

चैन्नई एक्स्प्रेस

रोहित शेट्टीच्या चैन्नई एक्स्प्रेस सिनेमामध्ये दीपिका शाहरुख खान सोबत झळकली. या सिनेमात पहिल्यांदा दीपिकाने प्रेक्षकांना हसवलं. तिचं ' मिनम्मा' हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. मसालापट सिनेमातून पहिल्यांदाच दीपिकाच्या अभिनयाचा विनोदी बाज समोर आला होता.

पिकू -

पिकू सिनेमात दीपिकासोबत अमिताभ बच्चन आणि इरफान खान हे दोन कलाकार होते. या दिग्गजांसोबत दीपिका तितक्याच ताकदीने उभी राहिली. सामान्य वाटणारे पण सर्वसामान्यांच्या कुटुंबातील प्रश्न आणि त्याचा झगडा दीपिकाने पिकू सिनेमात मांडला आहे.

कॉकटेल -

कॉकटेल सिनेमातून दीपिकाने अनेक समीक्षकांची मन जिकंली. कॉकटेल हा दीपिकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सिनेमा आहे . कारण यापूर्वी तिने बॉक्सऑफिस हिट पाहिले होते मात्र सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाची दाखल घ्यायला भाग पाडणार सिनेमा किंवा दीपिकाच्या वाट्याला आलं नव्हतं. यासिनेमातून दीपिकाने ते देखील मिळवलं आहे.

ओम शांती ओम

ओम शांती ओम हा फराह खान दिग्दर्शित सिनेमातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. एकाच सिनेमात दोन टप्प्यांवरच्या भूमिका साकारण्याचं आवाहन दीपिकाला पहिल्याच सिनेमामध्ये होते. सोबतीला बॉलिवूडचा किंग खान होता. 'ओम शांती ओम' हा सिनेमा तिच्यावर आधारित नसला तरीही तिच्या डायलॉग्सची आजही चर्चा होते.

आता दीपिका लवकरच मेघना गुलजारच्या चपक (Chappaak) या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.