
अभिनेत्री कोएना मित्रा (Koena Mitra) ही चेक बाऊंस प्रकरणी (Cheque Bouncing Case)गोत्यामध्ये आली आहे. स्थानिक सत्र न्यायालयाने कोईना मित्राला या प्रकरणामध्ये सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला कोएना विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मॉडल पूनम सेठीने कोएनाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. कोर्टाने कोएनाला 1.64 लाख रूपायांचे व्याज सह 4.64 लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. पूनम सेठीने 2013 साली कोएनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस पुरेशी रक्कम अकाऊंटमध्ये नसल्याचं सांगत चेक बाऊंस झाला होता. या आरोपांना नाकारत कोएना आता उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
कोर्टाने सुनावणी दरम्यान कोईनाकडून करण्यात आलेल्या याचिका खारीज केल्या आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कोएना ने पूनम सेठीकडून वेगवेगळ्या वेळेस सुमारे 22 लाख रूपये देणं आहे. ही रक्कम परत देण्यासाठी पूनमला 3लाख रूपये देण्यात आले होते मात्र तो चेकदेखील बाऊंस झाला आहे. Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजित बिचुकले यांना 'बिग बॉस' च्या घरातून अटक; चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात
पूनमने कोएना या चेक बाऊंस प्रकरणानंतर लीगल नोटीस दिली आहे. मात्र तिला रक्कम मिळाली नाही तेव्हा तिने पुन्हा तक्रार नोंदवली. या प्रकरणी 10 ऑक्टोबर 2013 दिवशी पूनमने कोर्टात कोएना विरोधात तक्रार दाखल केली आहे. या सुनावणी दरम्यान कोएनाने आरोपांचं खंडन करत पूनमची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाहीच की तिच्याकडून कोणाला 22 लाख रूपये उधार देऊ शकेल. यासोबत कोएनाने पूनमवर चेक चोरीचादेखील आरोप लावला आहे. पण कोर्टाने कोएनाच्या कोणत्याच आरोपांना मंजूरी न देता अखेर तिला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.