Kalank Song First Class: वरून धवन आणि कियारा अडवानी यांची दमदार केमिस्ट्री; क्लासी स्टेप्सने नटले फर्स्ट क्लास गाणे (Video)
Kalank song First Class (Photo Credits: YouTube)

करण जोहर निर्मित, अभिषेक वर्मन (Abhishek Varman) दिग्दर्शित एक महत्त्वाकांक्षी चित्रपट येऊ घातला आहे तो म्हणजे कलंक (Kalank). काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'घर मोरे परदेसीया' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. अल्पवधीत हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले. आता नुकतेच या चित्रपटातील दुसरे गाणेही प्रदर्शित झाले आहे. फर्स्ट क्लास (First Class) असे या गाण्याचे नाव असून, यामध्ये  वरून धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवानी (Kiara Advani) यांचा जलवा पाहायला मिळत आहे.

अरिजित सिंग (Arijit Singh) आणि नीति मोहन (Neeti Mohan) यांनी हे गाणे गायले असून, अमिताभ भट्टाचार्यचे बोल आहेत. रेमो डिसूजा याने या गीताचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. वरून एक उत्तम डान्सर आहे हे त्याने आधीच सिद्ध करून दाखवले आहे, या गाण्यातही वरूनच्या क्लासी स्टेप्सची मेजवानी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. पहिल्यांदाच वरून आणि कियारा या गाण्याद्वारे एकत्र आले आहेत, त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री एकदम फ्रेश वाटत आहे. (हेही वाचा: 'कलंक' मधील 'घर मोरे परदेसीया' गाणे 20 तासात 1 करोड लोकांनी पाहिले, अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांची चालली जादू)

40 च्या दशकातली कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.