‘Jawan’ on OTT: Netflix वर आता पाहता येणार 'जवान'; Shah Rukh Khan च्या बर्थ डे  च्या निमित्ताने गिफ्ट!
Shahrukh Jawan Movie PC twitter

शाहरूख खान (Shah Rukh Khan)आज 58 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने चाहत्यांना डंकीच्या सिनेमाचा पहिला टीझर त्या पाठोपाठ अजून एक गिफ्ट मिळालं आहे. Netflix ने 'जवान' सिनेमाचा extended cut आजपासून रिलीज केला आहे. नेटफ्लिक्स वर हिंदी, तमिळ आणि तेलगू मध्ये जवान (Jawan) रिलीज झाला आहे. 'X' वर शाहरूख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ही खूषखबर शेअर केली आहे.

'जवान' सिनेमा 7 सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. यापूर्वी रिलीज झालेल्या शाहरूखच्या 'पठाण' ने ₹543 कोटी भारतात कमावले होते तर ग्लोबली ₹1,043 कोटी कमावले होते. जवान ने हे रेकॉर्ड मोडले. मात्र अजूनही अव्वल स्थानी आमिर खानचा 'दंगल' आहे. दंगलची कमाई 2000 कोटींची आहे. Jawan Worldwide Collection: 'जवान' ठरला हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, नवीन कलेक्शनसह रचला इतिहास.

पहा ट्वीट

जवान सिनेमामध्ये नयनतारा, विजय सेतुपल्ली, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा आणि गिरीजा ओक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. या सिनेमाने ओपनिंग डे दिवशी 75 कोटी देशात कमावले होते तर जागतिक स्तरावर 129.06 कोटी कमावले आहेत. 'जवान' या सिनेमाची निर्मिती 300 कोटींमध्ये करण्यात आली आहे. पण या सिनेमाचे राइट्स नेटफ्लिक्सने 250 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. आता किंग खानच्या वाढदिवशी सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.