Jawan Worldwide Collection: 'जवान' ठरला हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, नवीन कलेक्शनसह रचला इतिहास
Jawan Poster (PC - wikipedia.org)

Jawan Worldwide Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' (Jawan) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचा बॉक्स ऑफिस आलेख दिवसेंदिवस समाधानकारक प्रगती करत आहे. या चित्रपटानंतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, अजूनही जवानची जादू कमी होताना दिसत नाहीये. जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'फुकरे 3'ची लोकांमध्ये क्रेझ आहे. पण त्याचा 'जवान'वर काही परिणाम झालेला दिसत नाही. 'फुकरे 3' च्या प्रचंड कमाईच्या दरम्यान, 'जवान' चित्रपटाने जगभरात असा टप्पा ओलांडला आहे, ज्यापर्यंत अनेक चित्रपट पोहोचू शकलेले नाहीत. या चित्रपटाने काही दिवसांपूर्वीच 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. 'जवान'चा वेग थांबायचं नाव घेत नाहीये. या चित्रपटाची जगभरातील ताजी आकडेवारी समोर आली आहे.

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई करणाऱ्या 'जवान'ने जगभरात 1117.39 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने चित्रपटाचे अधिकृत कलेक्शन घोषित केले आहे. ज्या वेगाने चित्रपटाची प्रगती होत आहे, ते पाहता 'जवान' बॉक्स ऑफिसवर मजबूत खेळाडू म्हणून उदयास आला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (हेही वाचा - Pan Masal Ad: Akshay Kumar ने Ajay Devgn, SRKसोबत पुन्हा केली पान मसाल्याची जाहिरात, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं अभिनेत्याला ट्रोल)

सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट -

'जवान'ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 1117.39 कोटींच्या ताज्या कलेक्शननंतर हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. जवान हा चित्रपट मूळ भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'जवान' वेगाने पुढे जात असून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. मात्र काही चित्रपटांचे जागतिक विक्रम मोडण्यात तो अजूनही मागे आहे. यामध्ये आमिर खानपासून ते साऊथ सुपरस्टार यशपर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.

दंगल- 2070.3 कोटी

बाहुबली 2- 1988.06 कोटी

RRR- 1236 कोटी

KGF चाप्टर 2- 1215 कोटी

एटली कुमार दिग्दर्शित जवान या चित्रपटात शाहरुखने दुहेरी भूमिका साकारली आहे. नयनतारासोबत शाहरुखची जोडीही चित्रपटात चांगलीच ठरली. याशिवाय, विजय सेतुपतीची खलनायकाची भूमिका आणि संजय दत्तच्या कॅमिओने कथेला मोहिनी घातली आहे.