Ulajh Posters Released: जान्हवी कपूर स्टारर 'उलझ' चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज
Photo Credit- X

Ulajh Posters Released: जान्हवी कपूर स्टारर उलझ चित्रपटाचा नवा पोस्टर(Ulajh Poster) रिलीज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) आएफएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, चित्रपटाच्या रिलीजची तारीख पोसपॉन करण्यात आली आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता पहायला मिळत आहे.

या सिनेमाची देशभक्तीविषयची कथा असून गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, सचिन खेडेकर, राजेश तैलंग, मियांग चांग, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून जान्हवीच्या सिनेमाची चर्चा सुरु झाली. जान्हवी यामध्ये सुहाना नावाचं पात्र साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट रिलिज झाला. 'धडक' या सिनेमामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मिली, गुडलक जेरी, गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, बवाल, मिस्टर अँड मिसेस माही असे अनेक सिनेमे केले आहेत.